Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई, जाणून घ्या सविस्तर

 Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई, जाणून घ्या सविस्तर  

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार नुकसान भरपाई, जाणून घ्या सविस्तर


Crop Insurance | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. इतकचं नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतीतील (Agriculture) पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी राजा आर्थिकदृष्ट्या (Financial) चांगलाच कोलमडला आहे. उत्पन्नाचा केवळ एक स्रोत असणाऱ्या शेतीतील (Agriculture in Maharashtra) पीकच नाहीसे झाले तर शेतकऱ्यांपुढे कोणता मार्ग उरेल. ही एक चिंतेची बाब आहे. आता अलीकडच्या काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.कधी मिळणार शेतकऱ्यांना आर्थिक मदत?
जुलै ते ऑगस्ट 2022 या काळात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 15 सप्टेंबरपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे. याबाबत माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणारं आहे.             ‘इतक्या’ कोटींची करण्यात आली तरतूद      राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणूनच राज्यात झालेल्या या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या नांदेड जिल्ह्यासाठी 877 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलाय.    दिवाळीपूर्वी मिळणार मदत     शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी नुकसानीची भरपाई रक्कम जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना या रक्कमेचा पुन्हा शेतीत नव्याने लागवड करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच सणासुदीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे👇👇

Comments

Popular posts from this blog

Pitachi Giran 100% subsidy ग्रामीण महिलांसाठी खुशखबर, पिठाच्या गिरणीला 100% अनुदान, ऑनलाईन अर्जाने Frap Flour Mill सुरु

Eknath Shinde Live खुशखबर कापसाचे भाव वाढणार

Soybean Market Prices: सोयाबीनचे भाव गगनाला भिडले,लातूर बाजार समितीत सोयाबीनला मिळालाय सर्वाधिक बाजारभाव