मान्सून सक्रिय! 'या' भागांत मुसळधारेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
मान्सून सक्रिय! 'या' भागांत मुसळधारेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
मान्सून सक्रिय! 'या' भागांत मुसळधारेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
पुणे/कोल्हापूर : राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रिय असून काही भागांत १६ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. (Maharashtra Rain Update) आज मंगळवारी (दि. १३) महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह मध्य भारताच्या काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक घाट भागात पुढील काही तासांत अधूनमधून जोरदार सरीसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे
राज्याच्या काही भागांत मुसळधार सुरूच राहणार
राज्याच्या काही भागांत १६ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर काही भागांत पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.
कोल्हापूरला ‘यलो अलर्ट’
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे (घाट-मुसळधार), कोल्हापूर (घाट-मुसळधार), सातारा (घाट-मुसळधार), औरंगाबादसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain Update)
13 सप्टेंबर, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे नाशिक घाट भागात पुढील 3.4 तासांत मधूनमधून तीव्र सरीसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 7.30 वाजताच्या नवीनतम रडार निरीक्षणावरून दिसून आले आहे. पुढे पावसाळ्याचा दिवस आहे. Rains.
Comments
Post a Comment