कापसाचे दणक्यात उत्पादन मिळेल, आता करा फक्त एवढे काम..!
कापसाचे दणक्यात उत्पादन मिळेल, आता करा फक्त एवढे काम..!
महाराष्ट्र मध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्र सध्या मोठ्या प्रमाणावरती आहे. मागील हंगामामध्ये कापूस पिकाला जास्त दर मिळाला असल्यामुळे यावर्षी कापूस लागवडच्या क्षेत्रात वाढ झालेली आपल्याला दिसून आलेली आहे.
गणपती बाप्पाचा शुभ मुहूर्तावरती जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाची खरेदी विक्री मार्केटमध्ये सुरू झाली, विभागातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आपला कापूस जळगाव मधील मार्केटमध्ये आणला त्यावेळी शेतकऱ्यांना तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला आणि हा बाजार भाव विश्वसनीय आहे. अशी परिस्थिती बघता सध्या कापसाला चांगलाच भाव यावर्षी राहील असे चित्र आपल्याला दिसत आहे.
येथे वाचा – कापसाला 16 हजार रुपये भाव मिळाला रे भो.., खरेदीची सुरुवात झाली दणक्यात..!
मात्र नैसर्गिक बदलत्या हवामानांमध्ये कापूस पिकाची योग्य व्यवस्थापन केले तरच आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बंधू भगिनींना कापूस पिकांमधून चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येणार आहे व त्याचा लाभ शेतकऱ्यांना चांगलाच मिळणार आहे. अचानक बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्र राज्यातील विविध भागांमध्ये कापसाच्या पिकावर ती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होत आहे
अशा परिस्थितीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी बंधू भगिनींना या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणावरती जोर देणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच किटकांवरती नियंत्रण करणे गरजेचे आहे. कीटकांवरती वेळोवेळी नियंत्रण नाही केल्यास कापसाच्या उत्पादनात घट होईलच सोबतच कापसाचे गुणवत्ता सुद्धा घसरेल, त्यामुळे आज आपण ह्याच विषयावरती चर्चा करणार आहोत की आपल्याला कापूस पिकावरील पांढऱ्या माशीचे नियंत्रण कशाप्रकारे करता येईल.
येथे पहा –
पांढऱ्या माशीची ओळख काय आहे
मित्रांनो पांढरी माशी ओळखणे एवढे काय अवघड नाही, पिवळे शरीर आणि पांढरी पंख असलेला एक हा कीटक आहे. इतर कीटकांप्रमाणे हा कीटक सुद्धा इकडून तिकडे वेगवान उडतो पांढरी माशी ही पिकांच्या पानांच्या खाली अंडी देते आणि काही दिवसांनी त्या अंड्यातून पांढऱ्या माशाची पिल्ले बाहेर निघतात व पानाच्या खाली राहून पानांमधून रस शोषण्यास सुरू करतात. पानांमधील रस शोषल्यामुळे संक्रमित झाडेही तेलकट दिसतात आणि झाडे पिवळी पडतात हे किडे पिकांमधील रस शोषतात व पिकाचे मोठ्या प्रमाणावर ती नुकसान करतात.
येथे वाचा – शेतकर्यांनो ‘या’ तारखेला मिळणार 12 व्या हप्त्याचे पैसे, पहा तारीख..!
पांढऱ्या माशीने कापसाचे नुकसान
पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पिकांवरती झाल्यामुळे पांढरी माशी पिकांचे नुकसान करतेच, सोबतच पांढऱ्या माशी मुळे तानांवर्ती पर्ल विषाणू बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. पांढरी माशी हा स्थलांतरित कीटक असल्यामुळे या बुरशीचा प्रादुर्भाव कीटकांसोबत इकडे तिकडे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पिकावर ती झाल्यास पिकाची पानेही हिरवी असतात ती काळी पडतात त्यामुळे प्रकाशन संश्लेषण क्रियेला मोठा अडथळा निर्माण होतो आणि उत्पादनाची गुणवत्ता कमी होऊन उत्पादनात घट होते
पांढरी माशी नियंत्रणासाठी औषध
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करून आपल्याला पांढऱ्या माशी वरती नियंत्रण करता येते माशीच्या नियंत्रणासाठी खालील कीटकनाशकांचा वापर करावा
१) डिफेनथियुरान 200 ग्रॅम
२) फ्लॉनिकॅमिड 50 डब्ल्यूजी
३) 80 ग्रॅम डायनोटिफेरन 20 टक्के एसजी
४) 60 ग्रॅम आणि क्लोथियानिडिन 50 डब्ल्यूजी 20 ग्रॅम
ही कीटकनाशके एकामागे एक प्रति एकरी 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची पंपाच्या साह्याने फवारणी करायची आहे. या कीटकांच्या वापरामुळे पांढऱ्या माशी वरती सहजपणे नियंत्रण करता येते वही औषधे पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार इथिओन @ 800 मिली प्रति एकर वापरण्याचा सल्ला आपल्याला कृषी तज्ञांनी दिला आहे.
वेळेवरती नियंत्रण नाही केल्यास ऑगस्ट सप्टेंबर नंतरच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा अतिप्रमाणावरती आपल्याला झालेला दिसून येतो, यासाठी कडुनिंब आधारित कीटकनाशक आणि ऑक्सिडेमेटॉन मिथाइल 25 टक्के EC किव्हा डायमेथोएट 30 टक्के EC कीटकनाशके 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करावी
यासोबतच शेतकरी मित्रांनो पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानांच्या खालती बुरशीचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी 400 मिली बुप्रोफेझिन 25 एस.सी. किव्हा 250 मिली स्पिरोमासिफेन किंवा 400 ते 500 मिली पायरीप्रोक्झिफेन औषध दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून प्रतिक्रियांची फवारणी करायची आहे
पांढऱ्या माशी सोबतच थ्रिप्स प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असेल तर या कीटकांच्या नियंत्रणासाठी डिफेंथियुरान 200 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची फवारणी
कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांचा वापर
पेरणीनंतर जवळपास 70 दिवसापर्यंत कापूस पिकावर ती निंबोळी युक्त औषधांची फवारणी करावी, यामध्ये तुम्ही नीम ओईल फवारणी करू शकता, नीम ऑइल ची फवारणी केल्यामुळे जे काही रस शोषक कीट आहेत म्हणजेच पांढरी माशी थ्रिप्स एफिड जस्सीड यासोबतच पानांना खाणारे आहे त्यांचे नियंत्रण नीम ओईल च्या फवारणीमुळे करता प्रत्येकी दहा दिवसाच्या अंतराने निम ऑइल ची फवारणी करून सर्वच कीटकांना आपल्या कापूस पिकापासून दूर ठेवता येते, औषधे कोणकोणते वापरावीत ते शिफारशीनुसार कृषी सेवा केंद्रातून घ्यावीत
महत्वाचे : शेतकरी बंधू भगिनींनो या लेखामध्ये आम्ही जी माहिती दिली आहे ती महत्वाची माहिती आहे, तरीही औषधाचा वापर करत असताना कृषी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment